विल्होळी : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. सारूळ येथे ११४ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यात रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, नावे कमी करणे, बंद पडलेले रेशनकार्ड पुनर्जीवित करणे, असे सर्व रेशनकार्ड कागदपत्रे घेऊन ताबडतोब नवीन रेशनकार्ड देण्यात आले. यावेळी सारूळ सरपंच डगळे, उपसरपंच सदानंद नवले, पोलीसपाटील प्रकाश नवले, गणपत सहाणे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारच्या सत्रात राजूरबहुला येथे १०९ नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी राजूरबहुला सरपंच सुशीला धुमाळ, उपसरपंच दिलीप चौधरी, पोलीसपाटील विलास चौधरी, वाळू जाधव, विजय चौधरी, अण्णासाहेब चिंधे, भीमा गोडसे, रामहरी जाधव उपस्थित होते. त्यानंतर आंबेबहुला येथेही १६६ नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शशिकला गवारी, उपसरपंच प्रशांत देशमुख, पांडुरंग गवारी, तानाजी बर्वे, ज्ञानेश्वर गवारी, विजू शिर्के आदींनी सत्कार केला.
सारूळ, आंबेबहुला येथे ३३९ रेशनकार्डाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:41 AM