नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी समाजातील विविध घटकांकडून वेगवेगळ््या उपाययोजना राबविण्यात येत असून या विविध सामाजिक संस्थांकडून संचार बंदीच्या काळातही कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक व आरोग्य सेवकांना मास्कचे वाटप करण्यात येत आहे. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेत शहरातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही विविध विभागांच्या क र्मचारी व अधिकाऱ्यांना उपस्थित रहावे लागत आहे. त्यांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याऐवजी आॅनलाइन सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी शासकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी शहर भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस मुख्यालय, एस.टी. महामंडळ, अंबड पोलीस ठाणे व शहरातील विविध भागातील कार्यरत पोलिसांना उद्योजक सौरभ राऊत, चेतन राऊ त यांच्यासह निखिल पाटील, हर्षल खोडे यांनी मास्क चे वाटप केले.
कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 4:41 PM
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेत शहरातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचे वाटप केले.
ठळक मुद्देपोलीस, सुरक्षा रक्षकांना मास्कचे वाटपविविध सामाजिक संस्थांचा सहभाग