सिन्नर : येथील पंचायत समिती कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजनेतील लाभार्थ्यांना उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या हस्ते नवीन विहीर व जुनी विहिर दुरु स्ती कामाच्या कार्यारंभ आदेशांचे वाटप करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, संगीता पावसे, सुमन बर्डे, दीपक बर्के, अशोक डावरे, कृषी अधिकारी कैलास भदाणे, रवीकांत पवार आदी उपस्थित होते. नवीन विहिरींसाठी चार, जुन्या विहीरींच्या दुरु स्तीसाठी १७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.त्यांना कार्यारंभ आदेश वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजनेतंर्गत अनुक्र मे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकरी लाभार्थ्यांना विहीर दुरु स्ती, पंपसंच, शेततळ्याचे अस्तरीकरण,पाईप व सूक्ष्म सिंचन या बाबींसाठी लाभ देण्यात येतो. या दोन योजनांमध्ये निवड होण्याआधी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची छाननी करु न सदर प्रस्ताव जिल्हास्तरावर लकी ड्रॉ पध्दतीने सोडत करु न निवड करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
नवीन विहीर व दुरुस्तीच्या कार्यारंभ आदेशांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:38 PM