कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे गरजेचे असल्यामुळे मास्कची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात तुटवडा जाणवत असून औषधं दुकानात मिळत नसल्याने राज सिलेक्शनचे संचालक जितेंद्र कापडणे यांनी ५०० मास्क तयार करु न कळवण शहरातील बँक, पतसंस्था व कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मास्क वाटप करु न मास्क लावण्याचे महत्व सांगून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.कळवण शहरातील दि कळवण मर्चंट को आॅप बँक, आनंद नागरी पतसंस्था, यशवंतराव चव्हाण पतसंस्था, अंबिका पतसंस्था, डॉ दौलतराव आहेर पतसंस्था, लोकनेते डॉ जे डी पवार पतसंस्था, धनलक्ष्मी पतसंस्था, विघ्नहर्ता पतसंस्था, भिला दाजी पवार पतसंस्था,श्री गजानन पतसंस्था, सिध्दीविनायक पतसंस्था, गजानन पतसंस्था, राजीव गांधी पतसंस्था आदीसह शहरातील पतसंस्थाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
बँक, पतसंस्था कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:05 PM