नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कर्मयोगी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळी सणानिमित्त गरीब, निराधार व आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. या संस्थेतर्फे मोखाडा तालुक्यातील पोशेरा व कातरवाडी या आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील मुले व आदिवासी बांधवांना फराळाचे व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर, ऋषिकेश जंगम, राजू मानवतकर, संतोष डोंगरे, योगेश जाधव, विनय शेरताटे, श्रावण कोंडेकर, दीपक दिवे उपस्थित होते.राजे संभाजी क्रीडा संकुल, जॉगिंग क्लबआश्विननगर येथील जॉगिंग क्लब, राजे संभाजी क्रीडा संकुल यांच्या वतीने गरजू व दिव्यांगांना एक करंजी, दोन लाडू व चिवडा फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अधिकारी मधुकर साळवे उपस्थित होते. यावेळी बाळा धाकराव, मामासाहेब रसाळ, दत्ता डोके, नितीन ढिकले, सचिन वारे, सुभाष पाटील, रवि चौधरी, पंकज चांदवडकर, बाजीराव महाले, सागर पवार आदी उपस्थित होते.नूतन विद्यामंदिरतर्फे फराळ, कपडे वाटपशिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचे औचित्य साधून वंजारवाडीतील आदिवासी भागात जाऊन गरीब मुलांना फराळ, नवीन कपडे, मिठाई, फटाक्यांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थी शुभम चव्हाण, मयूर चव्हाण, पवन चव्हाण, हर्षल चव्हाण, रामेश्वर आवटे, वैभव शिंदे, वैभव आडके, प्रफुल देशमुख, ऋतिक पगारे, आकाश पाटोळे, पवन कुटे, प्रवीण कानोजिया, सतीश पवार, सोमत जाधव, निलय धात्रक, आकाश जुंद्रे, राहुल शिंदे, ऋ षिकेश सामोरे, संकेत डोंगरे, प्रमोद लोहकरे, विशाल पवार, आकाश मोहिते, जयेश शिंदे, आदेश भांगे, आकाश वाघचौरे उपस्थित होते. कार्यक्रमास भरत चव्हाण, गौतम पगारे, प्रमोद राहाणे, महेश गायकवाड, सुभाष कांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरीआदिवासी वाड्यापाड्यांवरील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याची सामाजिक जाणीव मूळ धरत आहे. कै. दिलीप बागुल सामाजिक संस्था व ज्ञानोपासना बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेव गाव येथील धाराची वाडी येथील आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना फराळ व मुलांना शालेय वस्तूंचे कपडे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, तुषार शेलार, अमोल देशमुख, करणसिंग पवार, स्वप्नील जावळे, रोशन काठे, विजय दशमुखे, मिलिंद पिंगळे, विनय दिवीचा, अक्षय व्यवहारे आदी पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते.स्टेप फाउण्डेशन संस्थेच्या वतीने फराळ वाटपस्टेप फाउण्डेशन नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी लोकसहभागातून ग्रामविकास ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेअंतर्गत संस्थेमार्फत विविध उपक्र म राबविले जात आहेत. ग्रामीण आदिवासी बांधवांनी दिवाळी साजरी करावी व या बांधवांच्या घरी ज्ञानाचा दिवा लागावा यासाठी फाउण्डेशनच्या माध्यमातून बेलपाडा व आंद्रुटे (ता. पेठ ) या पाड्यांवर दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे तसेच कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माची सुरु वात कार्यक्र मस्थळी पणती लावून झाली. यावेळी स्टेप फाउण्डेशन नाशिकचे अध्यक्ष गोकूळ मेदगे, संस्थेचे सचिव दीपक देवरे, खजिनदार विक्र म बिडवे, संस्थापक सदस्य गोरक्ष मटाले, डॉ. प्रशांत मुसळे, छात्रभारतीचे सचिन भुसारे, सामाजिक कार्यकर्ते तेजस भुसारे, संस्थेचे स्वयंसेवक रोशन मेदगे, प्रतीक शिंदे, आकाश काळे, विश्विजत पाटील, ललित भदाणे, दीपक दुमणे, नितीन पाटील, आशिष जाधव, पंकज ताटे, अक्षय अहिरे, यशवंत पाटील, बेलपाडाचे सरपंच तुकाराम भोये, भुसारे, श्याम आवारी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना फराळ, कपडे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:47 AM