नाशिक : जेलरोड येथील दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थानच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन शाळेतील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आले. दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी जेलरोड हॉलीप्लॉवर शाळा व अभिनव मराठी शाळेतील सुमारे अकाराशे विद्यार्थ्यांना पंतग व तीळगुळ वापट करण्यात आले. त्यावेळी रमेश डहाळे यांनी संक्र ात सणाविषयी माहिंती दिली. हा सण एक भौगोलिक व सांस्कृतिक सण आहे. तसेच पंतग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करु नये. त्यामुळे पक्षांना , माणसाना, दुखापत होण्याची शक्यता असते असे त्याांनी सांगितले. तर हॉलीप्लॉवर शाळेचे संचालक सुदीप देब व अभिनव शाळेच्या मुख्यध्यापिका भालके यांनी विद्यार्थ्यांना पंतग उडविताना घ्यावयाची काळजी व पर्यावरण संरक्षण बाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अशोक वाणी, जोशी, गजानन महाजन, मधुकर शेलार, योगेश कपिले, बाळासाहेब जाधव , अविनाश यादव, शेखर सरोदे आदि उपस्थित होते.
संक्रातीनिमित्त विद्यार्थ्यांना अकराशे पतंगीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 5:19 PM
दुर्गामाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थानच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन शाळेतील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आले
ठळक मुद्देअकराशे विद्यार्थ्यांना पतंगीचे वाटप करून तिळगुळ देण्यात आलेपंतग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करु नये