कळवण : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोणा येथील ५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.लॉकडाउनमुळे रोजगारापासून वंचित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, वास्तुविशारद प्रमोद सुर्यवंशी, संजय गायकवाड, के. के. गांगुर्डे, माजी पं. स सदस्य सुनिता राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी स्वखर्चाने येथील प्रभाग क्र मांक १ मधील हातावर पोट असलेल्या गरजू लोकांना गहु, तांदूळ गोडेतेल, साखर,तूरदाळ, मुगदाळ, बेसनपीठ,चहा, मीठ, उडीद दाळ,मिरची, हळद, साबण, बिस्किट आदी १४ जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट ५० गरजूंना वाटप करण्यात आले. सदर गरजू लोकांचे सर्वेक्षण करण्यासाठी संजय पाटील,अनिल परदेशी, मंगेश बर्गे, दिपक केदारे, सौरभ बागुल, मयुर बागुल, सुरेंद्र साबळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच हर्षल वेढणे यांनी प्रत्येक गरजूंना कलिंगडचे वाटप केले..यावेळी अभोणा येथील आदिवासी सेवक अण्णासाहेब मराठे, सरपंच मिराताई पवार, राजेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वेढणे, मनोज वेढणे, शेखर जोशी, हरीशेठ सोनजे, हरिश्चंद्र देसाई, चेतन पवार, गणेश सुर्यवंशी,पप्पू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
अभोण्यात ५० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:08 PM