लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शासनाकडून जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झालेल्या बियाणांचे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालक शेतकऱ्यांना नुकतेच वाटप करण्यात आले.जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजना व राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत २३५ किलो मका, १६ किलो ज्वारी तर ३० किलो बाजरीचे बियाणे पशुपालक शेतकºयांसाठी उपलब्ध झाले होते. या बियाणांचे सरपंच सविता वारुंगसे, माजी सरपंच रामनाथ पावसे यांच्या हस्ते २३ पशुपालक लाभार्थींना प्रत्येकी ५ किलो मका बियाणे, ४ लाभार्थींना प्रत्येकी ४ किलो ज्वारी, तर ३० लाभार्थींना प्रत्येकी एक किलो बाजरीचे बियाणे देण्यात आले.पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. एम. आर. खतोडे, एस. बी. पाटील यांनी बियाणे वाटपाचे नियोजन केले. यावेळी संजय वाजे, गणेश वारुंगसे, मोहन माळी, रामा वामने, संपत ढोली, योगेश वारुंगसे, रमेश कुरणे, कैलास वामने, सोमनाथ वाजे, हरी नेहरकर आदींसह पशुपालक उपस्थित होते.
सिन्नरला पशुपालकांना बियाणांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 10:08 PM
सिन्नर : शासनाकडून जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झालेल्या बियाणांचे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालक शेतकऱ्यांना नुकतेच वाटप करण्यात आले.
ठळक मुद्दे३०० किलो बाजरीचे बियाणे पशुपालक शेतकºयांसाठी उपलब्ध