सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.मनेगावसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेल्या दोडी बुद्रुक गावात योजनेचे पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांना योजनेचे पाणी मिळत नाही, त्यामुळे तेथे शासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी तो पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी जनकल्याण समितीच्या या सामाजिक उपक्रमामुळे वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सरपंच मीना किरण आव्हाड यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अॅड. प्रकाश कुलकर्णी, जयप्रकाश केदार, शिवाजी केदार, माधवराव आव्हाड, उपसरपंच ज्ञानेश्वर आव्हाड, माजी सरपंच पी. जी. आव्हाड, माजी उपसरपंच सोेमनाथ आव्हाड, अरूण पवार, गणपत आव्हाड, सुकदेव आव्हाड, बाळासाहेब वाघ, बाळू दराडे, पाराजी शिंदे, त्र्यंबक केदार, संजय आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जनकल्याणच्या वतीने दोडीत पाणी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:37 PM