ठळक मुद्देमहाराष्ट्र वारकरी महामंडळाचे निवेदन
पेठ : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात आवश्यक ते नियमांचे पालन करून पेठ तालुक्यात धार्मिक कार्यक्रमांना रितसर परवानगी मिळावी, अशी मागणी वारकरी महामंडळाच्या वतीने निवेदनाव्दारे केली आहे.बुधवारी (दि.१७) नायब तहसिलदार मीनाक्षी बैरागी यांना दिलेल्या निवेदनात धार्मिक कार्यक्रम बंद असून शासनाने घालून दिलेले नियम, अटी यांचे पालन करुन कार्यक्रम सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, भिमाशंकर राऊत, रामदास शिरसाठ, संतोष देशमूख, किसन गावित, चंद्रकांत गवळी, संजय रहाणे, देवराम ठाकरे, आर. डी. भोये, बाबा गाडर, नामदेव देशमूख, उमाकांत शिंदे तसेच पेठ तालुक्यातील वारकरी मंडळी उपस्थित होते.