गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. वारकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता शासनाचे निर्बंध कटाक्षाने पाळले आहेत. गावोगावचे सप्ताह बंद झाले आहेत. कोणताही धार्मिक कार्यक्रम होत नाही. समाजामध्ये मानसिक संतुलन अबाधीत राखण्याचे काम वारकरी संप्रदायातील संत, महंत मंडळींनी केले आहे. सर्व व्यवहार काहीअंशी सुरू असताना समाजप्रबोधनाची प्रक्रियाच थांबलेली आहे. वस्तुस्थितीचा श्रमसाफल्याने विचार करून इतर विविध क्षेत्रांत ज्याप्रमाणे निर्बंध शिथिल केले आहेत, त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी देखील परवानगी देण्यात यावी. मार्गदर्शक तत्त्वांचे वारकऱ्यांकडून निश्चितच पालन केले जाईल, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हभप. वाल्मीक महाराज जाधव, हभप. संतोष महाराज मोरे, हभप. ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, हभप. प्रदीप जगताप, दिनकर पाटील आदींनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
(फोटो १४ वारकरी) - विभागीय आयुक्तांना निवेदन देताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप. वाल्मीक महाराज जाधव, समवेत दिनकर पाटील, संतोष महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, हभप. प्रदीप जगताप आदी.