पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवर असलेला भाजीपाला व्यवसायिकांमुळे परिसरात वाहतुकीस अडचण होऊन वाद होत आहे, त्यामुळे या व्यवसायिकांना मोकळ्या जागेत अथवा आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला विक्र ी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वणी चौफुलीवरील शिव वाहतूक सेनेने पिंपळगाव ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे.कोरोना काळात गर्दी होऊ नये यासाठी पिंपळगाव ग्रामपंचायतने शहरातील विविध ठिकांणी भाजीपाला विक्र ीसाठी परवानगी दिली. मात्र शेतकरी सोडता काहींनी आपला डाव साधत शहराच्या विविध ठिकाणी भाजी विक्र ी सुरू केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरात गेल्या दहा बारा वर्षांपासून आपली उपजीविका करणाºया मालवाहतूक वाहनांना अडथळा निर्माण झाला असून त्या ठिकाणी भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे शिव वाहतूक सेनेने या भाजीपाला व्यावसायिकांवर निर्बंध लादावे व त्यांना आठवड्यातून फक्त तीनच दिवस परवानगी द्यावी असे निवेदन ग्रामपंचायत व पिंपळगाव पोलीस प्रशासनाला शिव वाहतुक सेनेच्या वतीने सादर करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे, भगवान कांबळे, पांडुरंग गायकवाड, नितीन कराटे, रामदास शेवरे, अनिल मोरे, दीपक महाले, संजय भोये, खान्देराव निंबोने, पप्पू वडजे, प्रकाश बागुल, त्र्यंबक कडाळे, गणेश हिरे, रमेश चव्हाण, दत्तू कराटे, रवी शेवरे आदी उपस्थित होते.
भाजी विक्र ी करणाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस वणी चौफुलीवर परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 3:37 PM
पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवर असलेला भाजीपाला व्यवसायिकांमुळे परिसरात वाहतुकीस अडचण होऊन वाद होत आहे, त्यामुळे या व्यवसायिकांना मोकळ्या जागेत अथवा आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला विक्र ी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वणी चौफुलीवरील शिव वाहतूक सेनेने पिंपळगाव ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतीकडे शिव वाहतूक सेनेची निवेदनाद्वारे मागणी