येवला :विद्या हीच देवता व सेवा हाच धर्म समजून फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे.विद्यार्थ्यांनी सुशिक्षितहोतानासुसंकृतहोण्याकडेलक्ष केंद्रित करावे व ध्येयाप्रति वाटचाल करावी.असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचिलत एन्झोकेम विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही.परंतु अशिक्षित व्यक्तिदेखील सुसंस्कृत असते.यामुळे शिक्षण घेत असतांना सुसंस्कृत होणे देखील महत्वाचे आहे. विद्यार्थिनींनी स्वागतगीत, ईशस्तवन सादर केले.विद्यालयाच्या एन.सी.सी.पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्र माचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड माणिकराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून येवला तालुक्याची सततची दुष्काळी परिस्थिती, करंजवण धरणाची निर्मिती वर्णन करतानाच मांजरपाडा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा असा आशावाद व्यक्त केला.संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र पटेल यांना राष्ट्रीय पत्रकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. येमकोच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती हर्षाबेन पटेल यांचाही गौरव करण्यात आला. महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त सचिन कळमकर यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश जाधव, रामदास कहार, केशव काळे, दिलीप पाखले यांचाही या सोहळ्यात सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानित करण्यात आले.विद्यालयात एस.एस.सी. परीक्षेत प्रथम आलेल्या शुभांगी बोडके, इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रथम आलेली नेहा देवरे, बारावी वाणिज्यमध्ये प्रथम आलेली प्रगती वाडेकर, बारावी कला शाखेत प्रथम प्रियांका मोरे, उंदिरवाडी विद्यालयात प्रथम मोनाली सोनवणे, धामणगाव विद्यालयात प्रथम प्रीती जेजुरकर यांना गौरविण्यात आले. तसेच विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचा विद्यार्थी गोंडाळे याची गोळाफेकमध्ये व साक्षी लोणारी हिची ४२ किलो गटात कुस्ती प्रकारात विभागावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आमदार छगन भुजबळ यांचा सत्कार संस्थाअध्यक्ष पंकज पारख,तर माणिकराव शिंदे यांचा सत्कार चिटणीस सुशील गुजराथी यांचे हस्ते करण्यात आला.रसिका चव्हाण, चैतन्य पराते, रसिका झोंड, श्रुती वारु ळे यांनी सांस्कृतिक कार्यक्र म सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली.प्रास्तविक प्राचार्य दत्ता महाले यांनी केले. कार्यक्र मासरवींद्र काळे, सचिन कळमकर,दत्तू वाघ, सुरेश भावसार, सुभाष पाटोळे,विजया गुजराथी, एल. झेड. वाणी, सुमन वाणी, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, सत्यजित कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रत्नाकर तक्ते, अरु ण काळे,मकरंद सोनवणे, प्रज्ज्वल पटेल, मनीष गुजराथीआदींउपस्थित होते.सूत्रसंचालन दत्ता उटवाळे, पुष्पा कांबळे, सुरेश कोल्हे, उपप्राचार्य संजय बिरारी यांनी केले तर आभारराजेंद्र गायकवाड यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 5:24 PM
येवला : विद्या हीच देवता व सेवा हाच धर्म समजून फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे.विद्यार्थ्यांनी सुशिक्षितहोतानासुसंकृतहोण्याकडेलक्ष केंद्रित करावे व ध्येयाप्रति वाटचाल करावी.असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ठळक मुद्दे छगन भुजबळ: एन्झोकेम विद्यालयाचेवार्षिक पारितोषिक वितरण