वटार : परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार उपस्थितीत होते.प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला होता. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात मोठे हाल होत होते. जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत होते. शेतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. पण गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत असल्याने पठावा धरणाजवळील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले व धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हत्ती नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रश्न सुटणार असन, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळाची झळ सोसत असलेला बळीराजा यावर्षी शेतांत चांगले पीक येईन या आशेने आनंदाने भारावून गेला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून परिसरात ऐन पावसाळ्यात पाऊस दडी मारत होता, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचेही मोठे हाल होत होते. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती; पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने परिसरात कधी जोरात तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने परिसरातील शेतपिकाना जीवदान मिळाले आहे. खरिपाची शाश्वती नव्हती; पण आता रब्बीच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.- मच्ंिछद्र खैरनार, शेतकरी, वटार