साकोरा : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ! या म्हणीप्रमाणे अंगी मेहनत, काम करण्याची धमक आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकरी सतिष बोरसे याचे परिश्रम जिद्द म्हणावी लागेल. त्याने साकारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे तीन एच.पी.च्या कृषी पंपाच्या मदतीने शेती सिंचनाचा पर्याय उपलब्ध करून एक नविन किमया केल्याने खंडीत वीजपुरवठा तसेच वीज बीलाची कायमची कटकट मिटली असून, युवा शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रहिवासी, संगणक अभियंता सतिष निंबा बोरसे हा शिक्षण घेत असतानाच त्याच्या पित्याचे छत्र हरपले. तरी देखिल आईच्या जिद्दीमुळे त्याने शेती आणि नोकरी करीत ध्येय पूर्ण करून आज शेती करीत आहे. वडिलोपार्जित एकुण नऊ एकर कोरड शेती पूर्ण पावसाच्या भरवशावर अवलंबून असल्याने त्याने महावितरण कंपनीकडे विजपुरवठ्यासाठी वारंवार मागणी केली होती. विशेष म्हणजे वडील हयात असताना ते याच विज वितरण कंपनीत कामाला होते. परंतू संबधित शेती साकोरा येथून वेहळगांव रस्त्यावरील जामदरी फाट्यावर सारताळे शिवारात दुर्गम भागात असल्याने वितरण कंपनीला ते शक्य होत नसल्याने सतिष हतबल झाला होता. मात्र आपली कोरडवाहू शेती बागायती कशी करायची यासाठी त्याची नेहमी धडपड चालू होती. त्यातच एक नविन पर्याय सुचला आणि सौर- ऊर्जा प्रकल्पासाठी त्याने जैन कंपनीकडे मागणी करून अंदाजे खर्च विचारला असता, या युनिटसाठी सुमारे तीन लाख रूपये खर्च सांगितला. तो पैसा देखिल कसा उपलब्ध करावयाचा म्हणून विवंचनेत असतांना अचानक आपले सरकारवर आॅनलाईन अर्ज भरला मात्र त्यातही अधिकारी काही अपेक्षा ठेवून असल्याने ती फाईल धूळ खात पडली होती. त्यानंतर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कृपाआशीर्वादाने सन २०१५ या वर्षी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अवघ्या पंधरा दिवसातच संबधित प्रकरणाची चौकशी होउन महिन्याभरात सतिष बोरसे यांच्या शेतजमिनीत सौर-ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यावर तीन एच पी (डीसी) चा कृषिपंप सुरू झाला. त्यासाठी शासनाच्या मदतीने एकुण २२ हजार ५०० रूपये खर्च आला. त्यासाठी शेतजमीनीवर १२ पॅनल बोर्ड, वॉटर मीटर व काही साहित्य मिळाले आहे. दरम्यान प्रधानमंत्री सौर-ऊर्जा युनिटसाठी मंजुरी मिळाली तसेच शासकीय सबसीडी मिळाल्याने सतिषचे बागायतीचे स्वप्न साकार झाले. आज त्याने कोणत्याही शासकीय नोकरीची अपेक्षा न ठेवता, केवळ वडिलोपार्जित शेतीत आपल्या आई आणि पत्नीसह शेतीत राबतांना दिसत आहे.सौर- ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसभर विजपुरवठ्याची चिंता मिटली असली तरी मात्र रात्री घरात विजपूरवठा नसल्याने माझ्या कुटुंबाला रात्र अंधारात काढावी लागते आहे. दरम्यान बैलगोठा आणि घरासाठी सौर-ऊर्जा प्रकल्पांतर्गत नविन योजनेसाठी मी प्रयत्न करीत आहे.- सतिष बोरसे, शेतकरी, साकोरा
सौर उर्जेद्वारे शोधला शेती सिंचनाचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 7:09 PM
साकोरा : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ! या म्हणीप्रमाणे अंगी मेहनत, काम करण्याची धमक आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकरी सतिष बोरसे याचे परिश्रम जिद्द म्हणावी लागेल. त्याने साकारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे तीन एच.पी.च्या कृषी पंपाच्या मदतीने शेती सिंचनाचा पर्याय उपलब्ध करून एक नविन किमया केल्याने खंडीत वीजपुरवठा तसेच वीज बीलाची कायमची कटकट मिटली असून, युवा शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
ठळक मुद्देसाकोरा : संगणक अभियंता सतिष बोरसेचा नवा आदर्श