येवला : बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा पहिला माजी विद्यार्थी मेळावा ऑनलाइन स्वरूपात उत्साहात झाला. या मेळाव्यात अमेरिका, ओमानहून माजी विद्यार्थी असलेले अभियंते महाविद्यालयाच्या आठवणीत रमले.प्राचार्य डॉ. पी.एम. पाटील यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची ओळख करून दिली व विविध उद्दिष्टे सांगितली. २०१० पासूनचे १२० हून अधिक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महविद्यालयावरील प्रेम व्यक्त केले. अभिजित देसाई याने अमेरिकेतून, अक्षय आहिरे ओमानहून, अहमद इनामदार, मनोज गाडेकर, विकी गायकवाड, भाग्यश्री पाटील, गणेश मोरे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे संचालक रूपेश दराडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक अधिष्ठाता व मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. कमलकिशोर मणियार, संघटनेचे उपाध्यक्ष स्वप्निल थोरात, सेक्रेटरी अरविंद घोडके, सदस्य दत्तात्रय क्षीरसागर, जयंत केंगे, शुभम शिंदे, अमोल शिंदे, यू. एस. अन्सारी, ए. एस. चांदगुडे, पी. पी. रोकडे, डॉ. पी. सी. टापरे, एन. जी. गवळी आदी प्राध्यापक तसेच माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. रोहन पांडव यांनी सर्वांचे आभार मानले.
माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:30 PM
येवला : बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचा पहिला माजी विद्यार्थी मेळावा ऑनलाइन स्वरूपात उत्साहात झाला. या मेळाव्यात अमेरिका, ओमानहून माजी विद्यार्थी असलेले अभियंते महाविद्यालयाच्या आठवणीत रमले.
ठळक मुद्देमाजी विद्यार्थी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन