देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान, आळवंड येथे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत रोहित्र खराब होऊन नादुरुस्त झाल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत होते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महावितरण विभागाने तात्काळ कार्यवाही करत तेथे ६३ केव्हीचा नवीन रोहित्र बसविला. मात्र, आठ दिवसांतच अतिरिक्त विजेचा ताण वाढल्याने रोहित्र पुन्हा जळून नादुरुस्त झाले.नागरिकांनी वारंवार शंभर केव्हीचे रोहित्र बसविण्याची मागणी केली होती. परंतु महावितरण विभागाने नागरिकांची अडचण लक्षात न घेता ६३ केव्हीचेच रोहित्र बसविले. मात्र, ते आठ दिवसही तग धरू शकले नाही. आता तरी आळवंड गावाला शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.विजेच्या वारंवार येणाऱ्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असून, विजेवर चालणारी उपकरणे बंद पडली आहेत. ऑनलाइन परीक्षांच्या काळात वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरण विभागाने गावाची अडचण लक्षात घेऊन शंभर केव्हीचे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देहाडे आदींनी केली आहे.आठ दिवसांपूर्वी महावितरण विभागाने ६३ केव्हीचे नवीन रोहित्र बसविले. परंतु जेमतेम तग धरू शकले. परिणामी अतिरिक्त ताणाने नादुरुस्त झाला. आमची मागणी शंभर केव्हीच्या रोहित्राची आहे. तरी विद्युत विभागाने आळवंड गावासाठी शंभर केव्हीचा रोहित्र बसवावा.- विक्रम वाघ, सरपंच, आळवंड.(फोटो २९ आळवंड १)आळवंड येथील जेमतेम आठ दिवस चाललेले रोहित्र.
आळवंड गाव दोन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 5:47 PM
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. वारंवार विजेच्या त्रासाला नागरिक हैराण झाले असून, खंडित झालेल्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देविद्युत रोहित्र नादुरुस्त : रोहित्राची नागरिकांकडून मागणी