नाशिकरोड : मनपा निवडणूक उमेदवारी अर्ज भरून देण्याच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे.नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी नाशिकरोड विभागात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. आॅनलाइन पद्धतीने इंटरनेटवर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत सादर करता येणार आहे. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवाराला आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरून देण्यासाठी सहायता कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारणारचौथा शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीदेखील नेहमीप्रमाणेच्या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. प्रत्येक प्रभागात मतदान केंद्रासाठी शुक्रवारी निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी करून प्राथमिकदृष्ट्या त्यांची यादी तयार केली आहे. प्रभाग १७, १८ व १९ साठी निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. हौसारे, सहायक अधिकारी अनिल दोंडे व प्रभाग २०, २१ व २२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी पल्लवी निरबळ व सहायक अधिकारी पंकज लोखंडे काम पहात आहे. (प्रतिनिधी)
अमावास्या आणि शनीचा फेरा
By admin | Published: January 28, 2017 1:14 AM