इंदिरानगर : जेसीआय अंबड या संस्थेने होळीचा सण पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषण थांबविण्यासाठी रोपे वाटून साजरा केला. सुमारे १५ वर्षांपासून संस्था हा उपक्रम राबवित आहे. होळी हा सण साजरा करताना पर्यावरणाचा होणारा ºहास आणि प्रदूषण थांबवावे या विचाराने सन २००३ पासून जेसीआय अंबडने तत्कालीन अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाने होळी साजरी करणे सुरू केले. कालांतराने वनविभागाच्या सहकार्याने रोपे वाटपाने होळी साजरी करण्याला प्रारंभ झाला. यंदाही अध्यक्ष अमीत कोतकर यांच्या पुढाकाराने साधारण १५० रोपे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात वाटण्यात आली. यामध्ये जास्वंद, रातराणी, कदंब, अडुळसा, कढीपत्ता आदी रोपांचा समावेश होता. कार्यक्र म यशस्वीते साठी प्रियंका वाघ, अंकुश जाजू, अश्विन सोनवने, विवेक पाटील, विशाल तांदळे, प्रवीण वालझाडे, अमित कोठावदे, प्रमोद वाघ, अनिता वालझाडे, भावना सोनवणे, नागेश पिंगळे, सचिन कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक अरविंद विसपुते, डॉ. धनंजय अहिरे, सागर खाकुर्डीकर तसेच वनक्षेत्रपाल बिन्नर व वनपाल राजू इनामदार यांनी परिश्रम घेतले.
रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:48 IST
इंदिरानगर : जेसीआय अंबड या संस्थेने होळीचा सण पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषण थांबविण्यासाठी रोपे वाटून साजरा केला.
रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी
ठळक मुद्देसण साजरा करताना पर्यावरणाचा होणारा ºहास आणि प्रदूषण थांबवावे१५० रोपे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात वाटण्यात आली