दत्तनगर, चुंचाळे, अंबड, घरकुल योजना भागातील मळे परिसर तसेच औद्योगिक वसाहतीतील सर्व सर्वसामान्य नागरिक राहतात. या सर्व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेकवेळा निवेदने देवून देखील नवीन पोलीस ठाण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही . अपुरी पोलीस कर्मचारी संख्या तसेच सिडको येथे लांब अंतरावर पोलीस ठाणे असल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. या भागात कुंटणखाणे, बेकायदा अवैध दारू विक्रीची दुकाने, भुरट्या चोऱ्या व कामगारांची होणारी लुट पाहता शासनाने त्वरीत स्वतंत्र पोलिस ठाणे जाहीर करावे अन्यथा उपोषण आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी मनोज दातीर, नितीन दातीर, अरुण दातीर, विक्रम दातीर, विलास गवळी, मधुकर काळे, अनुसया गायधनी, अविनाश टिळे, मधुकर गायकवाड, चंद्रकांत जमधडे, गोकुळ दातीर उपस्थित होते.
अंबड, चुंचाळे भागात गुन्हेगारांचे राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:15 AM