नाशिक- खांदेशवासियांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोन दिवसीय उत्सवाची सांगता सोमवारी (दि.२०) वाजत गाजत करण्यात आली.श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. प्राचिन काळापासून सुरु असलेल्या या उत्सवाची परंपरा नवीन नाशिक परिसरातील श्रीकानबाई माता सार्वजनिक उत्सव समिती नाशिक यांनी सुरु केली होती. यावर्षीदेखील कानबाई मातेचा उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला.पारंपरिक कानबाई गीतांच्या ठेक्यावर शोभायात्रा उत्तमनगर-साइबाबानगर-महाकालीचौक परिसरातुन जगताप मळा येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात विसर्जन करण्यात आले. दरम्यान दरम्यान शोभायात्रेत कानबाईच्या गितांवर नगरसेवक छाया देवांग, मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, सार्वजनिक उत्सव समितीचे सद्य व नागरिक यांनी ठेका धरला. यावेळी पारंपरिक वाद्य, फुगड्या खेळणाºया महिला, लेझिम पथक आदिंच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत वाढली. यावेळी ‘लाल लाल लुगडानी व माय तु हिरवा पदरानी’, ‘कानबाई निघनी गंगेवरी’, ‘डोंगर हिरवा गार’ आदि अहिराणी गितांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी कानबाई मातेच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडाली होती. या मुख्य मिरवणुकीत परसरातील असंख्य घरातुन स्थापन झालेल्या कानबाइ मातेला भावपुर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी वसंत चौधरी, जगनअण्णा पाटील, अर्जुन वेताळ, भूषण राणे, शंकर पाटील, यशवंत नेरकर, जगन अहिरे, राजू परदेशी, दिलीप देवांग, रवी पाटील, नितीन माळी, भगवान पाटील, वसंत चौधरी, सुरेश सोनवणे, बी. आर. पाटील, चंदन जौधरी आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.