नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी चित्ररथांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. तसेच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना अहिरे यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी (दि.१४) अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर भीमगीतांनी परिसर भारावून गेला होता. सायंकाळी शहरातील विविध भीम जयंती उत्सव मंडळांसह राजकीय पक्ष व पदाधिकाºयांच्या सहभागातून मोठ्या राजवाड्यातून निघालेल्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी ‘जय भीम’चा जयघोष केला. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे निळेमय झालेल्या वातावरणात सायंकाळी मोठ्या राजवाड्यातून महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार जयंत जाधव, देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नगरसेवक गजानन शेलार, शोभा साबळे, संजय साबळे, महेश बिडवे, स्वाती भामरे, डॉ. हेमलता पाटील, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी शहाध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख सचिन मराठे, रामसिंग बावरी, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, राजू भुजबळ, आनंद सोनवणे, बॉबी काळे, दिलीप साळवे, किशोर काळे, राजेंद्र गांगुर्डे, संदीप डोळस, अशोक पंजाबी, मीर मुक्तार आश्रफी आदी उपस्थित होते. प्रशासनाने जयंती उत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेमुक्त मिरवणूक काढण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला बहुतेक मंडळांनी प्रतिसाद दिल्याने यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांसह सहभागी झालेल्या पथकांनी लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मिरवणुकीत बहुतेक मंडळांनी मिरवणुकीत ढोलपथकांना प्राधान्य दिले असले तरी काही मंडळांनी डीजेच्या धडाक्यात मिरवणुकीत सहभाग घेतला. या डीजेवर तरुणाईने ठेका धरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जल्लोष केला.
आंबेडकर जयंती उत्सव : चलचित्रांनी वेधले लक्ष; रस्ते गर्दीने फुलले जय भीमचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:08 AM
नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
ठळक मुद्देसुलोचना अहिरे यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेशहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली