सातपूर : सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रा. के. के. जाधव, उपाध्यक्ष बी. एल. चव्हाण, खजिनदार संपत अहेर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे, पांडुरंग सावंत, तसेच संध्या जाधव, राजेंद्र मोहिते, विजय धुमाळ, प्रल्हाद रायते आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालक, शिक्षक उपस्थित होते. सातपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नेते मधुकर मौले, सातपूर विभाग अध्यक्ष आशा भंदुरे यांच्या हस्ते राजवाड्यातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मीनाक्षी गायकवाड, पूनम शहा, संगीता अहिरे, मंजूषा कान्हे, मीनाक्षी मानकर, कलाबाई मोकळ, निशा तादोडकर आदींसह महिला उपस्थित होत्या. सातपूर कॉलनीतील मनपा विद्यानिकेतन शाळा क्र मांक आठमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मंगेश जाधव होते. रोहिदास गोसावी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकगीते यातून आंबेडकरांच्या कार्याचा उजाळा दिला. सोनजी गवळी, वैभव आहिरे, सुरेश खांडबहाले, यशवंत जाधव, सुरेश चौरे, पुनाजी मुठे, सोनिया बोरसे, पल्लवी शेवाळे, शारदा सोनवणे आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या हस्ते ठिकठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव, अमोल पाटील, अनिल भालेराव, प्रभाकर अहिरे आदी उपस्थित होते.चित्ररथांची मिरवणूकभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत ढोल-ताशाच्या गजरात सातपूर परिसरातील आंबेडकरप्रेमींनी चित्ररथांची मिरवणूक काढून जयंती उत्सव साजरा केला. ठिकठिकाणी मंडळाच्या आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आणि प्रतिमेचे पूजन केले. सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, पिंपळगाव बहुला आदी भागातील मंडळांनी स्वातंत्रपणे चित्ररथांची मिरवणूक काढली होती. सायंकाळी सातपूर गावात चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, नगरसेवक दीक्षा लोंढे, आरपीआय जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. स्वारबाबानगर येथून निघालेल्या मिरवणुकीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि शांतता समिती सदस्यांचे नगरसेवक दीक्षा लोंढे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी स्वागत केले.धम्मसागर प्रबोधन संघ, आरपीआय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, नगरसेवक दीक्षा लोंढे, पल्लवी पाटील, बाळासाहेब खरे, नितीन निगळ, श्रावण भक्ते, बाळासाहेब ढिकले, जी. एस. सावळे, रामहरी संभेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी भीमज्योत फेरी काढण्यात आली. यावेळी दिलीप काळे, बाजीराव पगारे, भीमराव जगताप, के. आर. संसारे, भाईदास सोनवणे आदींसह भीमसैनिक सहभागी झाले होते.
सातपूर परिसरात आंबेडकर जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:02 AM