राज्य नाट्य स्पर्धानाशिक : अति महत्त्वाकांक्षेपोटी टोकाची भूमिका घेणाऱ्या काही व्यक्ती आपल्या मार्गात येणाºया कोणत्याही व्यक्तीस आयुष्यातून दूर करून आपले इप्सित साध्य करतात. असाच अतिमहत्त्वाकांक्षी असलेल्या प्रेयसी अणि तिच्या तीन प्रियकरांची कथादिग्दर्शक विक्रम गवांदे यांनी रंगवली आहे.महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) नाशिकच्या शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे विजय साळवी लिखित ‘डार्लिंग’ नाटकातून संपत्तीसाठी पहिले प्रेम सोडून दुसºया तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी व त्याच्याशी विवाहबद्ध होत तिसºया प्रियकराच्या मदतीने संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करणाºया प्रेयसीची रहस्यमय कथा रंगमंचावर सादर करण्यात आले. यात पल्लवी ओढेकर, आशिष गायकवाड, समीर मोगल व श्रीराम गोरे यांच्या मुख्य भूमिका असून नेपथ्य दिग्दर्शक विक्र म गवांदे यांनीच केले आहे. संगीत संदीप महाजन यांनी दिले. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा अंकिता मुसळे यांनी केली आहे.
महत्त्वाकांक्षी प्रेयसीची रहस्यमयकथा ‘डार्लिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:02 AM