नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी एका बाजूला झुकून उलटल्याचे चालकाने सांगितले. मंगळवारी दुपारच्या सुमारास सिडको विभागातील घंटागाडी कचरा संकलन करून खतप्रकल्पावर जात असताना अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर ती उलटली. सुदैवाने या घंटागाडीत चालकासह असलेल्या कर्मचाºयांना कसलीही दुखापत झाली नाही. घंटागाडी ओव्हरलोडेड झाल्यामुळेच सदरची घटना घडल्याचे चालकाने सांगितले. महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. घंटागाडीत ओला आणि सुका कचºयासाठी स्वतंत्र कप्पे करण्यात आलेले आहेत. त्यात ओल्या कचºयाचे वजन जास्त होत असल्याने घंटागाडी एका बाजूला झुकते. त्यामुळे बºयाचदा वळणावर चालकाला कमालीची काळजी घ्यावी लागते. सदर घंटागाडी ही पूर्णपणे कचºयाने भरलेली होती. जादा वजनामुळेच वळणावर गाडी उलटल्याची घटना घडली. ओल्या कचºयाचे प्रमाण जास्त असल्याने गाड्या चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चालकांनी सांगितले.कच-याचे टार्गेटएका फेरीत घंटागाडीत जास्तीत जास्त कचरा संकलित करून आणण्याचे टार्गेट चालक व कर्मचाºयांना ठेकेदारांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे घंटागाडीच्या वारंवार फेºया मारण्याऐवजी कमीत कमी फेºयांमध्ये जास्तीत जास्त कचरा वाहून नेण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत असतात. त्यातूनच गाड्या ओव्हरलोडेड होऊन त्या घसरण्याचे अथवा उलटण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जाते.
अंबड औद्योगिक वसाहतीत अतिभाराने घंटागाडी उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:23 AM