लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून न्यू यॉर्क व सॅनफ्रान्सिस्कोला अडीच मेट्रिक टन केशर व बदाम यासह दहा टन आंब्याचा पहिला कंटेनर गुरुवारी रवाना झाला. फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. येथील विकिरण केंद्रावर आंब्यांबरोबरच कांदा- ४९३ मेट्रिक टन, इतर कच्चा माल- ३८९ मेट्रिक टन, मसाले- ६४० मेट्रिक टन व खाण्यायोग्य नसणारे पदार्थ- १० मेट्रिक टन अशा पदार्थांवर विकिरण प्रक्रिया झाली होती. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन हा आंबा पाठविला होता. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर बंदी घातल्याने हापूसचे आता काय होणार ही चिंता होती; पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा आता मोठ्या झपाट्याने अमेरिकेबरोबरच अन्य देशांतही कूच करू लागला आहे. अमेरिकेला पाठविण्यात येणाºया हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील पहिली विकिरण प्रक्रि या करण्यात आली. या केंद्रात मुंबईच्या अॅग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जात आहे. येथे ३१ आॅक्टोबर २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.लासलगावहून कंटेनर रवानालासलगाव येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाºया आंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा या प्रमुख जातींचा समावेश आहे. आंब्यावर विकिरण प्रक्रि या पूर्ण करून हा हापूस लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया,न्यू यॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे. मागील वर्षी सुमारे ५६० मेट्रिक टन आंबा अमेरिकेला पाठविला होता. यावर्षी ६०० मेट्रिक टन आंब्याचे उद्दिष्ट असल्याचे समजते.
कोकणच्या राजाची अमेरिका वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:13 AM
लासलगाव : येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून न्यू यॉर्क व सॅनफ्रान्सिस्कोला अडीच मेट्रिक टन केशर व बदाम यासह दहा टन आंब्याचा पहिला कंटेनर गुरुवारी रवाना झाला.
ठळक मुद्देआंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहेआंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा या प्रमुख जातींचा समावेश