नाशिक- मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर येत असून दिवसभर आणि सायंकाळी ही ते विविध गणेश मंडळाने भेटी देणार आहे.
मनसेने लोकसभा निवडणुका लढवण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर अमित ठाकरे यांची चारच दिवसात ही दुसरी भेट आहे. मनसेने नाशिक, पुणे, मुंबई या तीन ठिकाणी लोकसभा जागांवर लक्ष केंद्रित केले आहे चार दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी नाशिक मध्ये येऊन नाशिक लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता.
दरम्यान लगेचच ते नाशिकमध्ये दाखल होत असून गणेश मंडळांना भेटी देणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी ही पायाभरणी असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान नाशिक मध्ये सध्या गणेशोत्सव मंडळांना भेटी देणाऱ्याचे राजकिय नेत्यांचे सत्र सुरू असून यात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.