मुखेड ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली जय जनार्धन परिवर्तन पॅनेलने बाळासाहेब पाटील यांच्या आदर्श पॅनलला धोबीपछाड देत विजय मिळवला होता. गुरुवारी (दि. २५) निवडणूक निर्णय अधिकारी रमेश नूनसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. त्यात सरपंचपदासाठी अमोल जाधव तर उपसरपंचपदासाठी वृषाली पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी पंकज जाधव, सागर शिंगाडे, शरद गायकवाड, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, लीलाबाई पाटील, छाया जाधव आदींसह शरद शेळके, रमेश शेळके, संपत जाधव, सागर जाधव, विष्णू आहेर, राहुल जाधव, विजय पवार, पंकज पवार, विष्णू आहेर, बाळासाहेब जाधव, विक्रम जाधव, आशितोष जाधव, दत्तू पवार, रामनाथ साळुंखे, संजय साळुंखे, प्रकाश साळुंखे, अशोक आहेर, पांडुरंग क्षीरसागर, सतीश शेळके, लहानू जाधव, सतीश जाधव, विष्णू जाधव आदी उपस्थित होते.
मुखेडच्या सरपंचपदी अमोल जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:48 PM
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जाधव यांची तर उपसरपंचपदी वृषाली पवार यांची बिनविरोध निवड झाली असून स्थापनेनंतर मुखेड ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
ठळक मुद्दे स्थापनेनंतर प्रथमच फडकला भगवा