मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागातील आग पीडितांच्या घर उभारणीसाठी व सामाजिक बांधीलकी जोपासत सामाजिक कार्यकर्ते बंडूकाका बच्छाव यांनी कन्येच्या लग्नातील आहेराची १० लाख रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून वाटून देत आदर्श निर्माण केला आहे.
बच्छाव यांची कन्या प्राजक्ता हिच्या लग्नात आलेल्या आहेराची रक्कम मान्यवरांच्या हस्ते धनादेशद्वारे संबंधित आगपीडितांना वाटप करण्यात आली. रमजानपुरा भागात गेल्या २८ नोव्हेंबरला लागलेल्या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. जीवित हानी झाली नसली तरी नागरिकांचा निवारा हिरावला होता. घर बांधणीसाठी पैसे नसल्याने नागरिक हतबल झाले होते. बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपद्ग्रस्त मुस्लीम बांधवांची भेट घेऊन घर उभारणीसाठी प्रत्येकी कुटुंबाला मदत करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सुमारे १० लाख रुपये आपत्तीग्रस्तांना देण्यात आले आहे. बच्छाव यांच्या कन्येच्या विवाहातील आलेल्या आहेराच्या रकमेतून आग पीडितांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, सुहास कांदे, दिलीप बोरसे, अनिल कदम, माजी आमदार रशीद शेख, वसंत गीते, अपूर्व हिरे, भाजपचे गटनेते सुनील गायकवाड, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी आमदार आसीफ शेख, नगरसेवक एजाज बेग यांच्या हस्ते मदतनिधी धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सोबत फोटो....
===Photopath===
221220\22nsk_19_22122020_13.jpg
===Caption===
बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त आग पीडित कुटुंबियांना मदतीचा धनादेश देताना नवदाम्पत्य प्राजक्ता व प्रतिक.