शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
2
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
3
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
4
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
5
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
6
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
7
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
8
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
9
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
10
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
11
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
12
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
13
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
14
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
15
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
16
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
17
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
18
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
19
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
20
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका

नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकांत पाटील यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण

By संजय पाठक | Published: June 09, 2024 12:36 PM

आज संध्याकाळी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार शपथविधी सोहळा

संजय पाठक, नाशिक- नाशिकचे स्वच्छतादूत पर्यावरण कार्यकर्ते चंद्रकिशोर पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे नाशिकच्या नंदिनी नदी जवळ वास्तव्यास असून ही नदी स्वच्छ राहावी यासाठी जनजागृती करून स्वतः ही नदी स्वच्छ करतात याशिवाय गोदावरी नदी आणि नाशिक शहराचे स्वच्छतेसाठी जनजागृती करण्याचे काम ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरवही केला होता. त्याच प्रमाणे दिल्लीत बोलावून त्यांचा गौरव केला होता.

महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित आहेत तर एका खासदाराबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. तर रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आल्यानंतर, त्यांच्यापैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु त्यांना अद्याप फोन आलेला नाही, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदी