शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:14 AM

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. संत नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपल्या भक्त व परिवारासह येथे हजेरी लावली होती. वारकरी संप्रदायात वारीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून दिंड्या आणि पालख्या येतात. तीर्थक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. तर तीर्थक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. शेगावाहून गजानन महाराजांची पालखी येते. परभणी जिल्ह्यातून संत नामदेव महाराजांची पालखी तर पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी येते. खान्देशातून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. याशिवाय अनेक संतांच्या पालख्या येतात. सर्व जाती-जमातीचे लोक यामध्ये सहभागी झालेले असतात.‘विठु माझा लेकुरवाळा।संगे गोपाळांचा मेळा।।’असा आनंद सोहळा असतो. एकप्रकारे आध्यात्मिक आनंद या वारीमधून मिळतो. त्यामुळे जन्मभरात एकदा तरी वारी करावी, असे म्हटले जाते.‘सुखा लागे करीशी तळमळ ।तरी तू जाय एकवेळ, पंढरपूर।।मग, तू अवघाची सुखरूप होशी ।दु:ख विसरशी, तू जन्मोजन्मीचे ।।असे या वारीचे माहात्म्य सांगण्यात येते. आमच्या परिवारात वारीची परंपरा पूर्वीपासून आहे. माझ्या वडिलांनी हयातभर पंढरीची वारी केली. मीदेखील संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत गेलो आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीसोबत वारी केली आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष असतानाच्या काळात वारकºयांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमीच प्रयत्न केला. पूर्वी वारकºयांची संख्या कमी असायची. आता दरवर्षी वारकºयांची संख्या वाढत आहे. पूर्वी बैलगाडीतून पालखी नेत असत, सामान वाहन्यासाठीदेखील फारशी साधने नव्हती. आता पालखीसाठी रथ बनविण्यात आलेला आहे. सामान नेण्यासाठी वाहने असतात. त्याचबरोबर पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, पुरेशी औषधी आणि डॉक्टरांचे पथकदेखील असते. वारीमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे. काळानुरूप वारीत बदल होत आहे. तरुणवर्ग धार्मिक आध्यात्मिकतेकडे वळत असून, ही समाधानाची बाब आहे. - त्र्यंबकराव गायकवाड (लेखक, संत निवृत्तिनाथ  संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी