येवला : सरसेनानी तात्या टोपे यांच्या जन्मभूमीत महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने सेनापती तात्या टोपे महिलासोशल ग्रुपची स्थापना करण्यात आली. या ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त येवल्यात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन येवल्याच्या मुख्य अधिकारी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, पंचायत समितीच्या सभापती आशा साळवे, जि. प. सदस्य सविता पवार, डॉ. संगीता पटेल, सोनल पटणी यांच्यासह धनंजय कुलकर्णी, किशोर सोनवणे उपस्थित होते. या आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू यासह महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तंूचे अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते. शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान, स्नेहल कोळस, नगरसेवक पद्मा शिंदे, सायली खंदारे, प्रेरणा माळोकर, चित्रा नागपुरे, माधवी देशपांडे, सोनल परदेशी, मंदातक्ते, स्मिता परदेशी, संध्या पगारे, संध्या पगारे, शोभा झाडे, अश्विनी पवार, सविता जाधव, जयश्री शहा, कल्पना भागवत उपस्थित होत्या.
तात्या टोपे महिला ग्रुपच्या वतीने आनंद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:11 AM