नाशिक : कर्नाटकातील भाजपाची बुलंद तोफ आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थींचे गुरु वारी (दि.२२) नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गोदावरीच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले अनंतकुमार यांनी सुरु वातीला अभाविपच्या कार्यात लक्ष घालून पक्ष संघटनवाढीसाठी मोठे योगदान दिले. त्याचेच फळ म्हणून त्यांना पक्षात महत्वाची विविध पदे भूषिवण्याची संधी मिळाली. दक्षिण बेंगळुरू मतदार संघातून जनतेने १९९६ पासून त्यांना सलग सहावेळा लोकसभेवर निवडून दिल,े यावरूनच त्यांच्या कार्याची महती कळते. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी संसदीय कार्य खात्याचे मंत्रिपद भूषिवले. याआधी अटलिबहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही त्यांनी मंत्रिपद भूषिवले होते. कर्नाटकात भाजपा आज यशाच्या शिखरावर असून त्याचे खरे श्रेय अनंतकुमार यांना जाते. त्यांच्या अकाली निधनाने भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा नेत्याच्या अस्थी २२ नोव्हेंबरला नाशकात येणार असून पवित्र गोदावरी नदीच्या रामकुंडात त्याचे विधिवत विसर्जन होणार आहे.
अनंतकुमार यांच्या अस्थींचे गुरुवारी नाशकात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 5:46 PM
नाशिक : कर्नाटकातील भाजपाची बुलंद तोफ आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थींचे गुरु वारी (दि.२२) नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गोदावरीच्या रामकुंडावर विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी केले.
ठळक मुद्दे पवित्र गोदावरी नदीच्या रामकुंडात त्याचे विधिवत विसर्जन होणार आहे.