नाशिकरोड : पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. मित्र, ग्राहक, भिकारी आदींच्या मदतीने बडगुजर यांनी प्राचीन नाण्यांचा मोठा खजिना जपला आहे.नाशिकरोड येथील कपड्याचे व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी घरी असलेली नाणी जपून ठेवत व्यवसायात आलेली दुर्मिळ नाणी साठविण्यास सुरुवात केली. नाण्याचे प्रदर्शन किंवा नाण्यासंदर्भात आलेली बातमी, माहिती संकलित करण्यासोबत बडगुजर यांनी नाणे साठविण्याचा छंद असल्याचे त्यांचा मित्र, नातेवाईक, दुकानातील ग्राहक यांना माहिती झाल्यानंतर त्यांना आपोआप दुर्मिळ नाणी भेटू लागली. भारताने कुठले नवीन नाणे चलनात आणले किंवा कोणत्या राष्टÑपुरुषाच्या जयंतीनिमित्त ठराविक नाणे तयार केले तर बडगुजर पत्रव्यवहार करून ते नाणे हमखास आपल्याकडे मिळवू लागले. बडगुजर यांनी आपल्या दुकानांत साठवलेली नाणी व्यवस्थित पॅकिंग करून काचेच्या खाली ठेवल्याने त्याबाबत गिºहाईक विचारणा करू लागले. त्यामुळे बडगुजर यांच्याकडे मौर्य, यादव, शिव, ब्रिटिश कालीन नाणी गोळा होऊ लागली.बडगुजर यांच्याकडे भारताच्या प्राचीन काळापासून तर सध्या चलनात असलेल्या नाण्याचा मोठा संग्रह आहे. अमेरिका, हॉँगकॉँग, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ, जॉर्डन, इंडोनेशिया, जर्मनी, पाकिस्तान, श्रीलंका, जपान, आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, अरब प्रांतातील विविध देशांचे जुने न वापरात असलेल्या नाण्याचा मोठा खजिना आहे. बडगुजर यांच्या दुकानात यापूर्वी कामाला असलेल्या रवि कुमावत हे जॉर्डन देशातील एका हॉलमध्ये कामाला होते. तेथे कुमावत यांना टीप म्हणून विविध देशांची नाणी, नोटा मिळाल्या होत्या. कुमावत जॉर्डन देश सोडून नाशिकरोडला बडगुजर यांच्या दुकानांत कामाला लागल्यानंतर त्याने टीप म्हणून मिळाले. विविध देशांचे नाणे, नोटा बडगुजरांना दिल्याने त्यांच्या खजिन्यात मोठी भर पडली. महात्मा गांधी जन्मशताब्दी, योगाला आंतरराष्टÑीय दिन घोषित केल्यानंतर त्यावर्षी काढलेली २१ योग मुद्रा (नाणी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त काढलेले १२५ रुपयांचे नाणे, राष्टÑपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त काढलेली विशेष नाणी यांचादेखील त्यामध्ये समावेश आहे. बडगुजर आपला छंद मुलगा प्रशांत याच्या मदतीने जपत आहे.
प्राचीन नाणी, नोटांचा संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:42 PM
पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. मित्र, ग्राहक, भिकारी आदींच्या मदतीने बडगुजर यांनी प्राचीन नाण्यांचा मोठा खजिना जपला आहे.
ठळक मुद्देमोठा खजिना । भारतासह विविध देशांतील क्वाइन