नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात रामकुंडाजवळ असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. गोदाप्रेमी देवांग जानी यांनी कपालेश्वर मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करून मंदिराच्या छतावरील कळसाजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिलालेख आढळून आला. या शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत.कपालेश्वर महादेव मंदिराला धार्मिक-पौराणिक माहात्म्य लाभलेले आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर उगम पावलेली गोदावरी अर्थात दक्षिणगंगा नाशिकच्या रामकुंडात येताना धनुष्यकुंडापासून पुढे दक्षिणेला प्रवाहित होण्यास सुरुवात होते आणि याच ठिकाणी रामशेज किल्ल्यावरून उगम पावणारी अरुणा ही उपनदी गोदावरीला येऊन मिळते. म्हणून या ठिकाणी कपालेश्वर मंदिराची उभारणी झाली. भगवान शंकर यांनी गोदा-अरुणा संगमावर स्नान केल्यानंतर विश्रांतीसाठी जवळच्या उंच टेकडीची निवड केल्याचे सांगितले जाते.पुस्तकात माहितीशिलालेखाबाबत गॅझेटियरमध्येही नोंद नाही. मात्र ‘कि टू नाशिक-त्र्यंबक’ या पुस्तकात शिलालेख असल्याची माहिती मिळाली आहे.
पंचवटीत आढळला प्राचीन शिलालेख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 1:16 AM