निफाडच्या पश्चिमेला ७० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर पूर्वेला वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर आहे. या दोन्ही ज्योतिर्लिंगाच्या मधोमध निफाडच हे श्री संगमेश्वर मंदिर आहे. त्यामुळे निफाडचं श्री संगमेश्वर मंदिर हे धार्मिकदृष्ट्या तितकंच महत्त्वाचं आहे. या पुरातन मंदिराची बांधणी हेमाडपंती आहे. हे पुरातन मंदिर आठव्या वा तेराव्या शतकात बांधले गेले असे म्हणतात. हे मंदिर काळ्या पाषाणात असून, पूर्वाभिमुख आहे. श्री संगमेश्वर मंदिरात नित्यनियमाने पूजा केली जाते. श्री संगमेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते येथील व्यवस्थापन बघतात श्री संगमेश्वर भक्त मंडळाच्या महाशिवरात्रीला निफाड शहरातून कावडीची मिरवणूक काढण्यात येते गंगेच्या पाण्याने श्री स रुद्राभिषेक केला जातो. दरवर्षी शिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी सोहळे होतात. त्यानंतर भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप केले जाते. संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसराला विद्युत रोषणाई केली जाते. शिवाय दर शिवरात्रीला या मंदिरात फार मोठ्या संख्येने भक्त दर्शनाला येतात. श्रावण मासात या ठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. शासनाच्या विशेष निधीतून हा मंदिर परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे. येथे सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी सभामंडप उभारण्यात आले आहे. या मंदिराचे सुशोभिकरण झाल्याने आणि कादवा नदीकाठावर काठावर हे मंदिर असल्याने या मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे. शिवाय या मंदिरासमोर विस्तीर्ण अशी जागा असून, या जागेच काँक्रिटीकरण झालेलं आहे. या जागेच्या कडेने भाविकांकरिता बसायला सिमेंटचे बाकडे आहेत. मंदिराकडे येताना असलेल्या भद्रा मारुती मंदिराचाही जीर्णोद्धार निफाडकरांनी केला आहे. श्री संगमेश्वर मंदिर यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आलेलं आहे. (२२ निफाड)
220821\22nsk_20_22082021_13.jpg
श्री संगमेश्वर मंदिर.