नाशिक : प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.महानगरातील विधानसभा मतदारसंघ सरासरी साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे आहेत. हे मतदारसंघ पायी पिंजून काढायचे ठरवून आणि दिवस-रात्र एक करूनही आठवडाभरात ते शक्य नसल्याची जाणीव उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराच्या नियोजनकर्त्यांना आहे. त्यामुळे या पुढील पाच दिवस आता प्रचार यात्रा काढून धावती भेट देऊन रॅलीद्वारे प्रचारावर भर दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार हाच एकमेव पर्याय आता उमेदवारांकडे उरला आहे. काही प्रमाणात तरी कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या पक्षांना आणि त्या पक्षांच्या उमेदवारांना हे दिव्य पार पाडणे शक्य आहे. मात्र, ज्यांचे महानगराच्या प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, त्यांनाच हे शक्य आहे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात त्या त्या भागातील नातेगोते शोधून प्रचार सुरू आहे. काही उमेदवारांचे नातेसंबंध नाशिकसह खान्देशात अधिक प्रमाणात आहेत. अशा उमेदवारांचे नातेवाईकदेखील कामधंद्यावर आठवडाभराच्या सुट्या टाकून आपल्या दाजींच्या, भाऊंच्या, नानांच्या, चुलत्यांच्या, साडूंच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशकात दाखल झाले आहेत.नात्यांचा गोतावळा फायद्याचादिवसभरात एकाचवेळी वेगवेगळ्या भागात प्रचार करणे, रॅली काढणे, पदयात्रा काढणे त्याचवेळी संपर्क कार्यालयातून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे अशा सर्व बाबींसाठी हक्काचे आणि भरवशाचे कार्यकर्ते मिळणे सध्याच्या काळात दुरापास्त झाले आहे. अशावेळी ज्या उमेदवारांची नात्यागोत्यांची यादी मोठी आहे, त्यांना या गोतावळ्याचा फायदा मिळत आहे.उमेदवारांच्या घरांमध्ये भट्ट्या दिवसभर सुरूपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ऊठबससाठी असलेल्या संपर्क कार्यालयांच्या नजीकच्या एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये त्यांची नास्ता-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आता बाहेरगावच्या नात्यागोत्यातील लोकांचाही राबता वाढल्याने उमेदवारांच्या घरांच्या परसदारी किंवा आसपासच्या मोकळ्या जागेत चहा, नास्ता, जेवणाच्या व्यवस्थेसाठी भट्ट्या पेटल्या आहेत.
वºहाड आलंय प्रचाराला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:25 AM
प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.
ठळक मुद्देरणधुमाळी : खान्देशसह अन्य अनेक भागातून कुटुंब प्रचारासाठी नाशकात