शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

..अन् डॉक्टर ठरले सर्पदंश झालेल्या महिलेसाठी देवदूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 10:59 PM

नांदगाव : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरला मिळणाऱ्या मानाचा हेवा सामान्यांना वाटत असतो, मात्र प्रत्यक्षात जीवन मरणाच्या रेषेवर पोहोचलेला रुग्ण समोर आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते याचे उदाहरण येथील ग्रामीण रु ग्णालयात अनुभवयास आले.

ठळक मुद्देसुखरूप प्रसूती : बाळासह मातेची प्रकृती स्थिर; कुटुंबीयांनी सोडला नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरला मिळणाऱ्या मानाचा हेवा सामान्यांना वाटत असतो, मात्र प्रत्यक्षात जीवन मरणाच्या रेषेवर पोहोचलेला रुग्ण समोर आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते याचे उदाहरण येथील ग्रामीण रु ग्णालयात अनुभवयास आले.बाळंतपणाच्या एक दिवस आधी कोब्रा जातीचा नाग दंश झालेली अत्यवस्थ महिला रात्री रुग्णालयात आणली जाते. बाळाला वाचवायचे की आईला असा प्रश्न पडलेला असताना रात्रभर उपचार करून महिलेची प्रसूती केली जाते व बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसाठी डॉक्टर देवदूत.दरम्यान, आंतरराष्ट्रीय विष तज्ज्ञ डॉ. हिंमतराव बाउसकर यांचाही सल्ला घेतात, उपचार सुरूच असतात, मात्र बाळाचे काय करायचे असा प्रश्न उभा ठाकतो; परंतु काही वेळातच अनिताची सामान्य प्रसूतीहोते.आईच्या शरीरावर विष, प्रतिविष, प्रतिजैविकांचा मारा यातून जन्माला आलेले बाळ कसे असेल? त्यालाही विषाचा धोका असेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र, प्रथमदर्शनी बाळावर कसलाही परिणाम दिसून आला नसल्याचे कळताच सर्वजण सुटकेचा नि:श्वास सोडतात. बाळ व बाळंतिणीला सुखरूप घरी पाठविण्यात आले.शर्थीने उपचार नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे माहेरपणासाठी आलेली गर्भवती अनिता दत्तू बोरसे (२२) सायंकाळी लघुशंकेसाठी घराबाहेर जाते. मात्र, तिचा पाय नागावर पडतो. यामुळे चवताळलेल्या नागाने दंश केला. ही बाब कळताच कुटुंबीय तिच्या पायाला आवळपट्टी बांधून ग्रामीण रु ग्णालयात दाखल करतात. डॉ. रोहन बोरसे व त्यांचे सहकारी शर्थीने उपचार सुरू करतात.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर