शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

...आणि लाभला काकस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 5:10 PM

नाशिक : पितृपक्षात श्राद्धकर्म करून पितरांना नैवेद्य दाखवायचा तर कावळेच येईनात...मग कावळ्याचा शोध सुरू असतानाच एका झाडावर जखमी अवस्थेत कावळा दिसला आणि सर्वच जण त्या दिशेने धावले. काहींनी भूतदया दाखवून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या कावळ्याची सुटका केली पण नंतर मात्र या कावळ्याने नैवेद्याला स्पर्श करावा म्हणून सर्वांचीच धावपळ झाली. ...

नाशिक : पितृपक्षात श्राद्धकर्म करून पितरांना नैवेद्य दाखवायचा तर कावळेच येईनात...मग कावळ्याचा शोध सुरू असतानाच एका झाडावर जखमी अवस्थेत कावळा दिसला आणि सर्वच जण त्या दिशेने धावले. काहींनी भूतदया दाखवून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या कावळ्याची सुटका केली पण नंतर मात्र या कावळ्याने नैवेद्याला स्पर्श करावा म्हणून सर्वांचीच धावपळ झाली. येथील एका गृहस्थाने तर कावळाच हाती घेतला आणि ज्याला पाहिजे त्याला काकस्पर्श करून देण्याचा अनोखा प्रकार सुरू केला. शुक्रवारी एक वाजेच्या सुमारास नाशिकच्या तपोवन परिसरात हा प्रकार घडला.सध्या पितृपक्ष सुरू असून, श्राद्धकर्म सुरू आहे. दक्षिण गंगा गोदावरीच्या तटी श्राद्ध कर्माचे महत्त्व अधिकच. परंतु येथेही कावळ्यांची संख्या एक तर कमी आणि त्यातच श्राद्धकर्मानंतर ठेवण्यात येणारे पिंड किंवा नैवेद्याला शिवण्यासाठी कावळेच लवकर येत नाहीत ही एक समस्या. अशा स्थितीत पितृपक्षात पूर्वजांनी काकस्पर्श केला तर नैवेद्य ठेवणारेही समाधानी होतात. तथापि, तपोवनात जेथे खूप झाले आहेत, अशा ठिकाणीही कावळे अधिक असताना ते काकस्पर्श करेनात त्यामुळे परिसरातील नागरिक हवालदिल झाले होते. सकाळी अकरा वाजेपासून असे अनेकजण प्रतीक्षेत असतानाच एका झाडावर नायलॉनच्या धाग्यात एक कावळा अडकलेला दिसला. मग या कावळ्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्यात कोणाला यश न आल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. या दलाच्या जवानांनी तेथे येऊन कावळ्याची सुटका केली. त्यानंतर मात्र सर्वच जण नैवैद्य घेऊन त्या कावळ्यासाठी पुढे उभे राहिले. एका गृहस्थाने तर कावळाच आपल्या हाती घेतला आणि नैवद्याला काकस्पर्श करून सर्वांना पूर्वजांचा आशीर्वाद देऊन टाकला.