शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

...आणि नेटकऱ्यांनी केला ‘पोपट दिन’ साजरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:43 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच शनिवारी सकाळी (दि.२३) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्टसह इतर राजकीय पक्षांना धक्का दिला,

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच शनिवारी सकाळी (दि.२३) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्टसह इतर राजकीय पक्षांना धक्का दिला, तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी सोशल माध्यमांवर याची चर्चा करत दिवसभर वेगवेगळे विनोदांचे संदेश एकमेकांना पाठवून राजकीय पक्षांची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे. यात ‘रात्रीस खेळ चाले.. म्हणजे काय हे आता महाराष्टÑाला कळले’, ‘मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल.. मात्र एवढ्या सकाळी येईल असे वाटले नव्हते’, ‘घडी को पहले इस्तमाल करे फिर विश्वास करे, आज आहे जागतिक पोपट दिन...’ असे वेगवेगळे विनोद सोशल माध्यमांवर दिवसभर फिरत असल्याचे दिसले.लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला तरी सरकार स्थापन होत नव्हते. त्यामुळे राज्यपाल्यांच्या शिफारशीने राज्यात राष्टÑपती राजवटही लावण्यात आली. भाजप-शिवसेनेला मतदारांनी बहुमत देऊनसुद्धा दोघांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकमेकांशी काडीमोड केले. मात्र याचा फायदा घेत राष्टÑवादी व कॉँग्रेस पक्षाने शिवसेनेशी सत्तास्थापनेविषयी चर्चा करत महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिवसेनाला पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादी व कॉँग्रेसने ठरवून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शनिवारी राज्यपालांकडे जाऊन बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन करणार होते. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चितही करण्यात आले होते. मात्र अचानक सकाळीच फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. त्यामुळे इतर सर्व राजकीय पक्ष बुचकळ्यात पडले. एकीकडे सर्व राजकीय पक्षांचा मोठा गोंधळ उडाला होता, मात्र दुसरीकडे नेटकºयांनी या प्रकारावर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर विविध विनोद करत दिवसभर एकमेकांना संदेश पाठवून याची मजा घेतली.सोशल माध्यमांवर विनोदांचा पाऊस२३ नोव्हेंबर म्हणजे जागतिक पोपट दिवस..., महाराष्टÑाच्या विकासासाठी चोरून शपथ घेणारा पहिला मुख्यमंत्री आज जगाने बघितला..., तुम्हाला जर एकत्र यायचे होते तर मला कशाला पाडलं : एक पडलेला उमेदवार..., यातून काय शिकाल की प्रेयसीच्या नादात संसार मोडायचा नसतो..., मंडप सजला, नगारे वाजले, हळद लावून नवरा तयार आणि नवरी दुसºयासोबत फरार..., राजकारणावर नवीन पुस्तक येणार ‘बारामतीच्या करामती...’, गंगाधरच शक्तिमान निघाला..., हृदयविकाराच्या धक्क्याने सूत्रांचे निधन : सूत्राचा भाऊ..., उठा उठा सकाळ झाली, अरंरं हे काय झालं म्हणायची वेळ आली... असे विविध विनोद शनिवारी सगळ्याच सोशलमाध्यमांवर फिरताना दिसत होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण