शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

...अन‌् शहरात रात्री चालला  ‘खाकी’चा दंडासह दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 1:30 AM

शहर व परिसरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ वाजताच बंद करण्याचे आदेश शासनाने रविवारी (दि.२८) जारी केले. या आदेशाची शहरात पोलिसांकडूत तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. ज्या अस्थापनांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात येताच त्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाई मनपाच्या पथकाला सोबत घेत करण्यात आली. मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ही देण्यात आला.

ठळक मुद्देदहा दुकानांना दंड : कारवाईचा धडाका; आठ वाजताच शहर सामसूम

नाशिक : शहर व परिसरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ वाजताच बंद करण्याचे आदेश शासनाने रविवारी (दि.२८) जारी केले. या आदेशाची शहरात पोलिसांकडूत तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. ज्या अस्थापनांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात येताच त्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाई मनपाच्या पथकाला सोबत घेत करण्यात आली. मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ही देण्यात आला.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने रविवारी नवे आदेश जारी केले आहेत. केवळ वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजेला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी शहर पोलिसांनी तातडीने सुरु केली. नाशिकरोड, उपनगर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच विविध व्यावसायिकांना योग्य अंतरावर ग्राहकांना उभे राहण्याच्या सूचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर दिला गेला. सरकारवाडा पोलिसांनी मेहेर सिग्नलवरील हॉटेल मेहेर या अस्थापनेला नियमांचे भंग केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी ३ हजार तर मास्क न लावल्याप्रकरणी १७ बेफिकिर लोकांना एकुण साडेतीन हजारांचा दंड करण्यात आला. व्यावसायिकांची उडाली धावपळराज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्यासाठी शहर पोलीस रविवारी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी ‘खाकी’च्या शैलीत व्यावसायिकांना इशारा देत कारवाई सुरु केल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. यावेळी विना मास्क दुचाकींवरुन फिरणारे तसेच पादचाऱ्यांनाही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला. यामुळे शहरातील सर्वच भागात चोखपणे अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसून आले.पंचवटीत तीन बीअर बारवर कारवाईपंचवटी परिसराती तीन बीअर बार चालकांवर कारवाई करत पुढील आदेशापर्यंत ‘सील’ करण्यात आले. पोलिसांची धडक कारवाई शहरात एकाचवेळी सुरु झाल्याने नाशिकरोड भागासह मध्यवर्ती भागातील मेनरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा, गंगापुररोड, शरणपुररोड, भद्रकाली, जुने नाशिक या भागातील केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकानांची शटर डाऊन होण्यास सुरुवात झाली होती. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या