वन वर्ल्ड रहिवासी इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एनएसजीचे सुमारे १०० कमांडो अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांसह संपूर्ण काळ्या पोषाखात दाखल झाले. कमांडोची तुकडी वाहनांमधून क्षणार्धात खाली उतरली आणि वन वर्ल्ड या मोठ्या इमारतीच्या दिशेने सर्व कमांडोंनी एकापाठोपाठ धाव घेतली.
प्रत्येक कमांडोची हालचाल अत्यंत सावधानतेने आणि चपळाईने होती.
सांकेतिक चिन्हांतून एकमेकांना संदेश देत अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण इमारतीला या कमांडोच्या तुकडीने वेढा देत स्वत:च्या ताब्यात घेतले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हे कमांडो इमारतीच्या गच्चीवर गेले आणि दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरत पहिल्या मजल्यावर दडून बसलेल्या अतिरेक्यांचा माग काढला, तसेच अतिरेक्यांनी वेठीस धरलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करतात. प्रारंभी अचानक कमांडोंना बघून परिसरातील रहिवासी यांनी घराची दारे-खिडक्या लावून घेतली होती. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला होता; मात्र काही वेळातच रहिवाशांना ही रंगीत तालीम असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी खिडक्या उघडून गच्चीवर येत मोबाइलमध्ये कमांडो त्यांचे चित्रीकरण व फोटो काढण्यास सुरुवात केली होती. नाशिकरोड परिसरामध्ये एनएसजीच्या कमांडोंकडून पहिल्यांदाच मॉकड्रिल करण्यात आले.
---
फोटो आर वर १९एनएसजी/१/२/३/४