नायगाव - तिजोरीला हात लावताच सायरन वाजू लागल्याने घाबरलेल्या चोरटय़ांनी धुम ठोकली. येथील युनियन बँक आँफ इंडियाच्या शाखेत चोरटय़ांचा चोरीचा प्रयत्न केला. मात्न सायरनचा आवाज अन् बंदिस्त तिजोरीमुळे चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे . युनियन बँकेच्या शाखेत गुरूवारी ( दि.12 ) मध्यरात्नी दोन वाजेच्या सुमारास बँकेच्या समोरच्या खिडकीचे गज कापुन आत प्रवेश केला. आतील सर्व कँबिनमध्ये शोधाशोध करत पैशांची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्न तिजोरीला असलेल्या साईरन वाजल्याने व तिजोरी उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.वीस मिनिटांच्या कालावधी नंतर दोन्ही चोरटय़ांनी तेथून पलायन केले. शुक्र वारी सकाळी बँकेत चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी एम.आय.डी.सी.पोलिसांना चोरीची माहिती दिली.दरम्यान चोरटय़ांनी चोरीचा केलेला प्रयत्न बँकेतील सी.सी.टीव्ही मध्ये बंदिस्त झाला आहे. चोरीसाठी वापरलेली साहित्य बँकेच्या बाहेरच लावलेल्या स्कुटीवर ठेवून चोरटय़ांनी पलायन केले. बँकेतील चोरीची बातमी कार्यक्षेत्नातील गावांमध्ये पसरताच ग्रामस्थांसह ग्राहकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.पुढील तपास एम.आय.डी.सी.पोलिस करत आहे.
...अन् सायरन वाजताच चोरट्यांनी ठोकली धुम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:14 PM