शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

अन् भिंतीही बोलू लागल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 7:15 PM

कळवण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी कळवण नगरपंचायतने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्यमातून प्लास्टिक तसेच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या भिंती आता नागरिकांमध्ये जनजागृती करू लागल्या आहेत.

ठळक मुद्देकळवण : नगरपंचायतने हाती घेतले स्वच्छतेचे काम

कळवण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी कळवण नगरपंचायतने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्यमातून प्लास्टिक तसेच स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या भिंती आता नागरिकांमध्ये जनजागृती करू लागल्या आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने सुरू आहे. सन २०१९ मध्ये केंद्र शासनाने स्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ अंतर्गत केंद्र सरकारमार्फत ४ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण देशामध्ये मोहीम राबविली जाणार आहे.चौकट...या सर्वेक्षणात राज्यातील नवनिर्मित कळवण नगरपंचायतींसह एकूण ३८४ शहरे सहभागी झाली असून, या शहरांची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर दरमहा भरण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठीचे लक्ष्यांक निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. सर्व शहरांमार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे नियंत्रण सध्या विभागीय स्तरावरून प्रादेशिक उपसंचालक, नगर परिषद प्रशासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडून स्वच्छतेची आढावा घेतला जात असल्याने जिल्ह्यातील स्वच्छतेचा भारही जिल्हाधिकाºयांना उचलावा लागत आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमांना शहरातील नागरिक, संस्था तसेच शिक्षक, विद्यार्थी, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने सहभाग नोंदवत आहेत. नागरिकांचा हा प्रतिसाद व सकारात्मकता ही सर्वेक्षणांच्या मानांकनापेक्षा मोठी व कायम स्वरु पाची असल्याची भावना उपनगराध्यक्ष कौतिक पगार व मुख्याधिकारी डॉ. सचीन पटेल यांनी व्यक्त केली आहे.स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कळवण नगरपंचायतने नियोजनात्मक आराखडा तयार केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी नगरपंचायतचे पथक शहरात कार्यरत असून नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर बंद करावा. स्वच्छ, सुंदर व समृध्द कळवणसाठी नगरपंचायतला सहकार्य करावे.- मयुर बहीरम,नगराध्यक्ष, कळवण नगरपंचायत.या सर्वेक्षण मोहिमेत कळवण शहराला मानांकन मिळावे, ऐतिहासिक व धार्मिक असलेले कळवण शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता नगर पंचायतचे प्रयत्न आहे. शंभर टक्के स्वच्छ व कचरामुक्त करणे हे प्रशासनाकरिता आव्हानात्मक असले तरी शहराला केवळ नामांकन मिळावे म्हणून नाही तर शहर खºया अर्थाने स्वच्छ व सुंदर बनावे याकरिता नगरपंचायतकडून दैनंदिन स्वच्छतेच्या कामासोबत काही नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यास सुरुवात केली आहे.डॉ. सचिनकुमार पटेल,मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत. (फोटो ०३ कळवण, ०३ कळवण १, ०३ बहिरम, ०३ सचिन पटेल)