लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना आवश्यक मदत व्हावी, यासाठी शासनाच्या अंगणवाडीसेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची माहिती जमा करण्याचे काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका व मदतनिसांना त्यांच्या कामाचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नसल्याने त्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.मनपा हद्दीत कोरोनासंदर्भात महापालिका अंगणवाडीसेविका मदतनीस कोरोनासंदर्भ कामासाठी व सर्वेक्षण नोंदणीसाठी दिसून येत नाही. प्रशासनाने त्यांची तत्काळनोंदणी करून त्यांना कोरोनासंदर्भ कामासाठी सहभागी करून घ्यावे. तसेच मनपा हद्दीत आजपर्यंत कोरोनासंदर्भात मनपाच्या अंगणवाडीसेविका, मदतनीस यांना मनपातर्फे तत्काळ पीपीई किटसह आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच अंगणवाडीसेविका व मदतनिसांना त्यांच्या कामाचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नसल्याने त्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक बुरु ंगे, युवराज सैंदाणे, नितीन शेवरे, किसन सोनवणे, एकनाथ खैरनार यांनी केली आहे.अंगणवाडीसेविका, मदतनीस या आपला जीव धोक्यात घालूनरु ग्णांची सेवा करण्यासाठी फिरत असल्या तरी मात्र शासनाकडून त्यांची कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयी सुरक्षितता, खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना पीपीई किट, सॅनिटायझर्स तसेच साबण पुरविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
अंगणवाडी मदतनीस पीपीई किटपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:40 PM
पंचवटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना आवश्यक मदत व्हावी, यासाठी शासनाच्या अंगणवाडीसेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची माहिती जमा करण्याचे काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका व मदतनिसांना त्यांच्या कामाचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नसल्याने त्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देजिवाला धोका : प्रोत्साहन भत्ता मागणी