शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अंगणवाडी सेविका डिजिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 9:50 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आता डिजिटल झाल्या असून, त्यांचा संपूर्ण कारभार पेपरलेस झाला आहे. कुपोषणमुक्ती, महिला आणि युवतींचे आरोग्य, बालकांना पोषण आहार आदींची माहिती काही क्षणात सर्व्हरवर पाठविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपायलट प्रोजेक्ट : कुपोषणमुक्तीसह आरोग्याची माहिती सर्व्हरवर

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आता डिजिटल झाल्या असून, त्यांचा संपूर्ण कारभार पेपरलेस झाला आहे. कुपोषणमुक्ती, महिला आणि युवतींचे आरोग्य, बालकांना पोषण आहार आदींची माहिती काही क्षणात सर्व्हरवर पाठविण्यात येणार आहे.केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याची निवड पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील ३६० अंगणवाडी सेविकांना डिजिटलचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्र माचा शुभारंभ करण्यात आला.महिला आणि बालविकास विभागाकडून प्रत्येक अंगणवाडी सेविकेला अत्याधुनिक मोबाइल संच वितरित करण्यात आला. त्यासोबत अंगणवाडी केंद्रात ज्या मोबाइल कंपनीला नेटवर्कआहे त्या कंपनीचे सिमकार्ड, सहा महिन्यांचे रिचार्ज करण्याची रक्कम आणि मेमरीकार्डसुद्धा देण्यात आले आहे. या मोबाइलमध्ये विशेष सॉफ्टवेअर असून, अंगणवाडी केंद्रातील दहा प्रकारचे रजिस्टर आॅनलाइन स्वरूपात भरता येणार आहेत.इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक आणि समन्वयक म्हणून बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, पर्यवेक्षक ज्योती काळे, अलका खांदवे, सविता लोहरे, मंदा गायकवाड, सुखदा पाराशरे, मंगला झडे, चित्रा कुलट, पूर्वा दातरंगे, चंद्रकला साबळे, संध्या देशमुख, फरझाना नाईकवाडी यांच्याकडून कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आहे. शुभारंभप्रसंगी डॉ. प्रदीप कागणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.आधुनिकतेची कास धरून आम्हाला डिजिटल करण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून दहा प्रकारचे रजिस्टर भरण्यात वाया जाणारा वेळ वाचणार आहे. याचा उपयोग अंगणवाडी केंद्राला देऊन वेळेचा सदुपयोग होईल.- संजीवनी वाघमारे, अंगणवाडी सेविका, पिंप्री सदोतालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका प्रशिक्षित करून पारदर्शक कामकाज करण्यासाठी काम सुरू आहे. १ मे या दिवशी संपूर्ण अंगणवाडी केंद्र आणि सेविका डिजिटल होऊन आॅनलाइन आणि पेपरलेस कारभार सुरू होईल. यासाठी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत.- किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी