शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अंगणवाडी सेविकांची जिल्हा बॅँकेवर धडक वर्ष उलटले : कुपोषित बालके, गरोदर मातांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:48 AM

नाशिक : कुपोषित बालके व गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनेचे ७३ लाख रुपये वर्ग करण्यात आल्यावर वर्ष उलटूनही बॅँकेकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बॅँकेवर धडक दिली.

ठळक मुद्दे२५ रुपये याप्रमाणे अनुदान खात्यावर पैसे नसल्याचे कारण

नाशिक : कुपोषित बालके व गरोदर मातांसाठी राज्य सरकारकडून चालविण्यात येणाºया पोषण आहार योजनेचे ७३ लाख रुपये जिल्हा बॅँकेकडे वर्ग करण्यात आल्यावर वर्ष उलटूनही बॅँकेकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा बॅँकेवर धडक दिली. उसनवार करून कार्यकर्त्यांनी गोरगरिबांना पोषण आहार पुरविला, परंतु हक्काचे पैसे मंजूर असूनही मिळत नसल्याने केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून कुपोषित बालके, स्तनदा माता व गरोदर महिलांना पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीलाच त्याचे कंत्राट देण्यात आले असून, ८ महिने ते ८ वर्षे वयाच्या बालकांना अंडी, केळी, दूध, तर गरोदर महिलांना पोषण आहार तयार करून तो त्यांना घरोघरी वाटप करण्यासाठी प्रतिमाणशी २५ रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या वर्षासाठी बागलाण तालुक्यासाठी पोषण आहार योजनेंतर्गत ७३ लाख ५१ हजार ३२५ रुपयांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडे जमा केले व सदरचे अनुदान ते पंचायत समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्तीला अदा करण्याचे ठरविले. जानेवारी २०१७ मध्ये धनादेशाद्वारे जिल्हा बॅँकेत अनुदान जमा झाले असले तरी, बॅँकेने नोटाबंदीचे कारण देत इतकी मोठी रक्कम एकाच वेळी अदा करता येणार नाही, असे सांगत आरटीजीएस करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार टप्प्याटप्प्याने काही रकमांसाठी आरटीजीएस करण्यात आले. परंतु खात्यावर पैसे नसल्याचे कारण देत धनादेश परत करण्यात आले. सोमवारी यासंदर्भात बागलाण तालुक्यातील सुमारे ३० ते ४० अंगणवाडी सेविकांनी थेट जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाला धडक दिली. यावेळी त्यांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. यावेळी अहेर यांनी अंगणवाडी सेविकांना उर्मटपणे उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘बॅँकेकडे तुमचे काहीच घेणे नाही, परत बॅँकेत पाय ठेवू नका’ असे अहेर यांनी म्हटल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. तसेच त्यांनी बॅँकेतूनच बागलाण पंचायत समितीला दूरध्वनी करून यापुढे बॅँकेत कोणाला पाठवू नका, असा दमही दिला.दरम्यान, शेकडो किलोमीटरहून आलेल्या अंगणवाडी सेविकांना पैसे तर मिळालेच नाही पण बॅँकेच्या अध्यक्षांकडून मात्र खडे बोल ऐकून माघारी फिरावे लागले. गेल्या एक वर्षापासून स्वत:च्या हक्काचे व कष्टाचे पैसे मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची पंचायत समिती व जिल्हा बॅँक अशा दोन्ही ठिकाणी फरपट होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना भेटणाºयांमध्ये आरती खरे, सुनंदा जाधव, जिजाबाई वाघ, रजनी कुलकर्णी, सीमा पवार, ज्योती शिरसाठ, गीतांजली जगताप, मीना गावित यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.