नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात दारू पिण्यास जायचे आहे, त्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली असता पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजली अरुण मुर्तडक (रा. शुक्र तारा सोसायटी पाथर्डी फाटा) या आपल्या पती व दोन मुलांसह राहतात. बुधवारी (दि.१) अंजली व त्यांची मैत्रीण साडेसहा वाजेच्या सुमारास घरात असताना पती अरु ण मुर्तडक त्यावेळी घरी आला. त्याने अंजलीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले; मात्र पैसे न दिल्याने राग येऊन शिवीगाळ करीत स्वयंपाक घरातील भांड्यांची आदळआपट सुरू केली. त्यावेळी स्वयंपाक घरातील चाकू घेऊन पत्नी अंजलीच्या मानेवर व पायावर वार केले. सोसायटीतील नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी पोलिसांनी जाऊन संशयित आरोपी अरु ण मुर्तडक यास ताब्यात घेतले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अरुण मुर्तडक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग येऊन पतीचा पत्नीवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:12 PM
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात दारू पिण्यास जायचे आहे, त्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली असता पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजली अरुण मुर्तडक (रा. शुक्र तारा सोसायटी पाथर्डी फाटा) या आपल्या पती व दोन मुलांसह राहतात. बुधवारी ...
ठळक मुद्देसंशयित आरोपी अरुण मुर्तडक यास ताब्यात घेतले