नाशिक: कालिका देवी मंदिराच्या विक्रेत्यांना मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने यात्रा बहरणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या सुमारे दीडशे ते दोनशे विक्रेत्यांनी महापालिका, पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करत लाखो रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विक्रीचे साहित्य आगाऊ खरेदी केल्याने त्यावर पाणी सोडण्याची वेळ आल्याचे विक्रेत्यांनी बोलून दाखविले.ग्रामदेवता कालिकादेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर गडकरी चौक सिग्नल ते महामार्ग स्थानकापर्यंत विविध विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात. मंदिराच्या प्रवेशद्वारापुढे दुतर्फा पूजेचे साहित्य विक्री करणा-या कालिका मंदिराच्या विक्रेत्यांची जागा राखीव ठेवली जाते. मात्र यावर्षी महापालिकेने जरी लिलाव केले असले तरी पोलीस प्रशासनाने मात्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार असल्याचे सांगत परवानगी नाकारली. त्यामुळे महापालिकेने लिलाव रद्द केले. दोन्ही प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. बुधवारी (दि.१०) घटस्थापना होणार असून, अद्याप एकाही विक्रेत्याला मंगळवारी संध्याकाळपर्यंत दुकाने थाटण्यास परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे यात्रोत्सव अडचणीत सापडला आहे. मंदिराच्या परिसरात यात्रेची लगबग जरी पहावयास मिळत असली तरी मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला मात्र यात्रोत्सवाची तयारी नजरेस पडत नाही. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला कालिका मातेच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्णत: अंतिम टप्प्यात येते. विक्रेत्यांकडून विविध खेळण्यांसह खाद्यपदार्थांची दुकानेदेखील थाटली जातात. पहिल्या माळेपासूनच दर्शनासाठी पहाटे महिला भाविक मंदिरात हजेरी लावणार आहेत. पूजेसाठी लागणारे पूजा साहित्य विक्रेत्यांची दुकाने नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परवानगीचा प्रश्न सोडवावादसरा, दिवाळी सण सुमारे दीडशे-दोनशे लहान विक्रेत्यांचे कुटुंब देवीच्या यात्रोत्सवातून मिळणा-या उत्पन्नावरच साजरे करतात. त्यामुळे महापालिका असो किंवा पोलीस प्रशासन त्यांनी तातडीने विक्रेत्यांच्या परवानगीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निखिल मोटकरी, रुपाली शिंदे, संतोष शिंदे, सोनाली मंडलिक, अर्चना पवार, कमल धाडगे, गोदावरी झुटे, लक्ष्मण येवले आदींनी केली आहे.आकर्षक सजावट; तीस सीसीटीव्ही कॅमेरेमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिराच्या गाभा-यापर्यंत परिसर सजविण्यात आला आहे. आकर्षक पद्धतीने सजावट करून रोेषणाई करण्यावर भर दिला गेला आहे. तसेच मंदिराच्या गाभा-यापासून संपूर्ण परिसर तीस सीसीटीव्ही कॅमेºयांच्या देखरेखीखाली आणण्यात आला आहे.
कालिका देवी मंदिराच्या विक्रेत्यांचा संताप; परवानगीचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 5:27 PM
ग्रामदेवता कालिकादेवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर गडकरी चौक सिग्नल ते महामार्ग स्थानकापर्यंत विविध विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात.
ठळक मुद्देआकर्षक सजावट; तीस सीसीटीव्ही कॅमेरेपरवानगीचा प्रश्न सोडवावा