मालेगाव मध्य : खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शहरातील दातारनगर, नजमाबाद भागातील नागरिकांनी शनिवारी मदनीनगर विद्युत उपकेंद्राला घेराव घातला. उपअभियंता सय्यद यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही समाधान न झाल्याने नागरिकांनी ठिय्या दिला. शेवटी कार्यकारी अभियंता भामरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.दातारनगर, नजमाबाद, सरसय्यदनगर व ६० फुटी रस्ता भागात मागील चार ते पाच महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याचा काही परिणाम होत नव्हता. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत होता. काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेली ५ केव्हीचे रोहित्रावरुन वीजपुरवठा खंडित करीत दुसऱ्या रोहित्राला जोडण्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याची कुणकुण रहिवाशांना लागताच शनिवारी रहिवाशांनी उपकेंद्राला घेराव घातला. यावेळी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदनीनगर विद्युत उपकेंद्राला संतप्त नागरिकांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 11:04 PM
मालेगाव मध्य : खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या शहरातील दातारनगर, नजमाबाद भागातील नागरिकांनी शनिवारी मदनीनगर विद्युत उपकेंद्राला घेराव घातला. उपअभियंता सय्यद यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही समाधान न झाल्याने नागरिकांनी ठिय्या दिला. शेवटी कार्यकारी अभियंता भामरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.
ठळक मुद्देविजेच्या लपंडावाने संताप : कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन